
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथे गावठी दारूची भट्टीवर मारवड पोलिसांनी छापा टाकून भट्टी उध्वस्त केली असून एकास रंगेहाथ पकडत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुडी प्र. डांगरी येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने एपीआय शितलकुमार नाईक यांच्या आदेशावरून मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता सुकलाल उर्फ मोठाभाऊ उगलाल भील (वय ३७) हा पांझरा नदीकाठी झाडाझुडुपात गावठी दारू तयार करताना आढळून आला. त्यास रंगेहाथ पकडत ३० लिटर रसायन व १२ लिटर तयार गावठी दारू नमुने घेवून नष्ट करण्यात आली. सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ भारत श्रीराम इशी हे करीत आहेत.

