अमळनेर:- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात पूज्य साने गुरुजी जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते.
साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थिनी संपदा पाटील हिने केले. यावेळी स्पर्धा परीक्षेचे संचालक विजयसिंह पवार यांनी पूज्य साने गुरुजी यांच्या कार्यावर प्रकाश टाकतांना म्हणाले कि, 1928 साली साने गुरुजींनी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार प्रभाव होता. स्वतःच्या जीवनात देखील ते खादी वस्त्रांचाच वापर करीत असत. समाजातील जातीभेदाला, अस्पृश्यतेला, अनिष्ट रूढी परंपरांना साने गुरुजींनी कायम विरोध केला. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या साने गुरुजींनी 1930 साली शिक्षकाची नौकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली. पुढे 1942 च्या चळवळीमधे भूमिगत राहून सानेगुरुजीनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नाशिकला कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले, धुळे येथे कारागृहात असतांना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली ‘गीताई’ लिहिली. असे सांगत कार्यक्रमात त्यांच्या कार्यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला. साने गुरुजी वाचनालयाचे जेष्ठ संचालक भीमराव जाधव, सहचिटणीस सुमित धाडकर, ईश्वर महाजन व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी कोमल पाटील, कोमल भोई, किरण लांबोळे,जलमित्र मयूर देसले बाबाजी पाटील, आदित्य पाटील, सानेगुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे कर्मचारी रमेश सोनार, मधुकर बाळापुरे उपस्थित होते.