अमळनेर:- शहरातील पैलाड भागातील एकाने जातीय तेढ निर्माण होईल असे लिखाण इंस्टाग्राम या सोशल मीडियावर केले होते. यावर आक्षेप घेत समाज बांधवांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी नाशिक येथे काळाराम मंदिर परिसरात आपत्तीजनक पत्रक वाटण्यात आले होते. तर त्याविरुद्ध नाशिक शहरात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या विरोधात व विशिष्ट समाजाच्या विरोधात इंस्टाग्राम या सामाजिक माध्यमावर जातीय तेढ निर्माण होईल असे लिखाण केले होते. ही बाब शहरातील समाज बांधवांना कळताच त्यांनी अमळनेर पोलीस ठाणे गाठले व स्वप्नील सुरेश पाटील (रा. पैलाड अमळनेर) या तरुणावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार 3 (1) (r), 3 (1)(s) तसेच भारतीय दंड संहिता 295(A) व 506 नुसार गौरव सुधाकर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर हे करीत आहेत.