कळमसरे येथे सावित्री माई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न…
अमळनेर:- आजही लोकांना महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीमाई फुले ह्या फक्त समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे आग्रही असल्याचे वाटते. मात्र महात्मा ज्योतीराव फुले, सावीत्री माई फुले हे तत्वज्ञानाची खाणही होते, असे प्रतिपादन कळमसरे येथे सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमप्रसंगी प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक चौधरी होते. तर प्रमुख उपस्थिती खान्देश माळी महासंघाचे मुरलीधर महाजन, प्रा. डॉ. लीलाधर पाटील, सरपंच जगदीश निकम, प्रा. सुरेश महाजन, विकास सोसायटीचे माजी चेअरमन बाबुलाल पाटील केमिस्ट असोसिएशनचे मुरलीधर चौधरी, माळी पंच मंडळाचे अध्यक्ष हेमंत चौधरी, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, विकास पाटील, अरुण चौधरी, सुदाम चौधरी, एकनाथ चौधरी,किशोर चौधरी, भालचंद्र चौधरी, नथु चौधरी, दीपक चौधरी, मोतीलाल महाजन, सुरेश चौधरी, सचिन निकम भीमराव महाजन, प्रकाश महाजन, भरत महाजन, विजय चौधरी, किसन सिंग राजपूत यांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री माई फुले यांच्या जीवनावर नाटीका चिमुकल्यानी सादर केल्याने ग्रामस्थांचे डोळे पाणावले होते. या कार्यक्रमाला महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माळी समाज मंडळाचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील यांनी केले.