अमळनेर :- धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदी पात्रात आज दुपारी आवर्तन सोडण्यात आले असून नदिकाठावरील गावांना त्याचा मोठा फायदा होणार असून अमळनेर तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा प्रश्न सुटणार आहे.
अक्कलपाड्याचे आवर्तन आज दि.6 रोजी दुपारी 4 वाजता सुटल्याने हे पाणी मंगळवारी धुळे तालुक्यातील न्याहळोद गावापर्यंत पोहचेल.पांझरेत पाणी सोडण्यात आल्याने तब्बल धुळे तालुक्यासह पांझरा काठावरील शिंदखेडा, अमळनेर तालुक्यातील 85 गावांच्या पाणीपुरवठा योजना जिवंत होवू लागल्या आहेत. गेल्या 10 वर्षांपासून अक्कलपाड्याचे दोन आवर्तने सोडून टंचाईवर मात केली जात आहे. 85 गावांची पाणी टंचाईवर मात झाली आहे. यामुळे यंदाच्या पिण्याचा पाण्याचा टंचाईवर समस्या दुर झाली असून धुळे व अमळनेर तालुकावासीयांना दिलासा लाभला आहे. यामुळे धुळ्यासह अमळनेर तालुक्यातील गावांचा फायदा झाला आहे. धुळे पाटबंधारे विभागाच्या पाटबंधारे अधिपत्याखालील असलेल्या पांझरा नदीवरील बांधण्यात आलेल्या कोल्हापूर बंधाऱ्यात शेतकरी पाणी अडवून धरतात याकरिता पुढील गावांना पाणी पोहचत नाही यामुळे वाद निर्माण होतात. त्यासाठी पाणी सोडण्याआधीच पाटबंधारे विभागाने फळ्या काढल्या. त्यामुळे गतीने पाणी पोहचणार आहे. अक्कलपाडा धरणातून पाणी सोडल्यानंतर पांझरा काठ परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून पाणी पूर्ण क्षमतेसह धरणात भरल्याने धरणातील पाणी सोडण्यात आले आहे.
प्रतिक्रिया…
सध्या अक्कलपाडा प्रकल्पातून 500 क्युसेक्स जलसाठ्याचा विसर्ग सुरू आहे. आगामी कालावधीत पुढील आदेश येईपर्यंत हा विसर्ग सुरू राहणार असून गरज भासल्यास यात वाढ करण्यात येणार आहे.
:- विवेक महाले,कार्यकारी अभियंता – अक्कलपाडा धरण