
अमळनेर:- तालुक्यातील मूडी येथील एकाचा चक्कर येऊन पडल्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
स्वप्नील पाटील यांच्या खबरीनुसार दिनांक १ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता ते घरी असताना गावातील एकाने त्यांना फोन केला की, प्रदीप पुंडलिक सूर्यवंशी यास चक्कर येवून तो शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे. तेव्हा त्यास गावापर्यंत बैलगाडीत आणून त्यानतंर खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. यावरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




