अमळनेर:- तालुक्यातील जैतपिर येथे नवीन पाण्याची टाकी व महाराणा प्रताप यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुकेश राजपूत यांनी केली आहे.
गावात नविन पाणी टाकी मंजूर करून शुध्द पिण्याच्या पाणी सोय व्हावी तथा जुनी टाकी जीर्ण झाली असुन लवकरच ते काम मार्गी लावावे. तसेच गावातील बस स्टैंड निकामी रुपात आहे तरी त्याचा वापर होत नसुन ती जागा रिकामी करण्यात यावी व त्या जागेवर विर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे स्मारक करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जैतपिर येथील ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडे सदरची मागणी करण्यात आली आहे.