अमळनेर:- अमळनेर शहरात काल चार कोरोना बाधीत आढळले आहेत.
अँटीजेन चाचणीत १, तर आरटीपीसीआर चाचणीत ३ रुग्ण आढळले आहेत. सर्व रुग्ण शहरातील असून त्यामुळे तालुक्यात संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.