अमळनेर:- शहरातील साने नगर भागातील स्मशानभूमी येथील दुरुस्ती व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
प्रभाग क्रमांक २ मधील साने नगर भागातील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असल्या कारणाने तसेच याठिकाणी बसण्याच्या जागेची सोय नसल्याने समस्यांची दखल घेत नगरसेविका नूतन महेश पाटील व सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांच्या प्रयत्नांतून दुरुस्ती व सुशोभीकरण कामास मान्यता मिळाली असून नगरपरिषदेच्या माध्यमातून स्मशानभूमीत बसण्यासाठी ओटा पायऱ्या, पेव्हर ब्लॉक व डागडुजी करण्यात येणार आहे. नुकतेच सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व तरुण उपस्थित होते. यावेळी समस्या सोडविल्याबद्दल नगरसेविका नूतन पाटील व सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांचे आभार मानले.