अमळनेर:- तालुक्यातील गोवर्धन येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
गोवर्धन जिल्हा परिषद मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना सरपंच पंकज निकम यांना पाणी पिण्यासाठी एक्वाचे जार तसेच पुस्तक वाटप केले. पंचायत समितीतील क्लर्क अनिल पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना दप्तर देवू केले. सरपंच यांनी आवाहन केले असता गावातील नागरिकांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्टस ड्रेस घेण्यासाठी हातभार लावला. ग्रामपंचायत सदस्य वर्षा पवार, मनीषा महाले, पोस्टमन सुनील पाटील, सदस्य शामकांत पाटील, पोलीस पाटील काजल पारधी, सदस्य गब्बरसिंग गायकवाड, राजेंद्र पाटील यांच्याकडून विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली. ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत कर्मचारी यांना ड्रेस कोड देण्यात आला.