अमळनेर:- तालुक्यातील पाडळसरे येथील युवा कार्यकर्ते सागर सुकदेव कोळी यांना राष्ट्रीय सेवा योजना तसेच युवक कल्याण क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मानार्थ युवकमित्र परिवार संस्था पुणे मार्फत दिला जाणारा ‘ स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय युवा संमेलनात सागर सुकदेव कोळी यांना राज्याचे वनविभागाचे महावनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, बुक क्लब चे संस्थापक अविनाश निमसे,मंथन फाऊंडेशनच्या संस्थापिका आशाताई भट्ट, युवक मित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, बादलसींग गीरासे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सागर कोळी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातुन विविध उपक्रम राबवुन वंचीत विकासाबरोबर लोककल्याणाचे कार्य करीत असतात या कार्याची दखल पुरस्कारासाठी घेण्यात आल्याचे कोळी यांनी सांगितले. यावेळी सद्गुरू सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सचिन म्हसे,अदिती निकम, बादलसींग गिरासे, कार्तिक चव्हाण, मंगलाताई नागुल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.
Related Stories
December 22, 2024