डीजेच्या तालावर नाचत, पतंग उडवत बालगोपालांसह नागरिकांनी घेतला आनंद…
अमळनेर:- शहरातील श्रीकृष्णपुरा, वडचौक, सावतावाडी, शारदाकॉलनी श्रीराम कॉलनी, शिवाजीनगर व परिसरातील नागरिक, बाळ गोपाळ व महिला मंडळींसाठी सालाबादप्रमाणे खास मकर संक्रांती निमीत्ताने माजी नगरसेवक विक्रांत पाटिल व समाजसेविका स्वप्ना पाटिल यांनी माझा प्रभाग पतंग महोत्सव आयोजित केला होता.
या महोत्सवात सर्वांना मोफत पतंग देवून सर्वांनी जोशपुर्ण उत्सवात पतंग उडवून डी.जे.च्या तालावर डान्स करत, नाचत आनंद घेतला. सदर पतंग महोत्सवाचे फुगे व पतंग हवेत सोडून माजी आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भेट देण्यासाठी खान्देश शिक्षण मंडळाचा उपाध्यक्ष माधुरी पाटिल, माजी मार्केट प्रशासक तिलोत्तमा पाटिल, उद्योजिका लीना पाटिल, रंजना महाजन, कविता मराठे, शितल सोनार, वैशाली कुलकर्णी, नलिनी बारी, प्रतिभा बारी, राजसबाई भोई, वर्षा पाटील, जयमाला धनगर, प्रतिभा पगारे, सौ. नलिनी ईश्वर पाटिल, विद्या पाटील यांचेसह रणजित पाटील, माजी सरपंच सुरेश पाटिल, कैलास पाटील, प्रमोद सोनार, अरुण पाटील, शरद पाटील, श्याम साळी, बाळू पाटील, मुकेश ठाकूर, प्रवीण ठाकुर, गणेश सोनवणे, शिवम पवार, गणेश बारी, भुषण महाजन, पंकज वाघ, भैय्या पाटिल, बंटी पाटील, भटू सैंदाणे, जगदीश सोनार, अशोक पाटील, सागर शेटे, दिनेश शेटे, कमलेश बोरसे, राजेश परदेशी, राकेश शेटे, नितेश चव्हाण, हितेश बारी, जयेश बडगुजर, समाधान पाटिल, समाधान नाथबुवा, निरज पाटकरी, यासह मोठ्या संख्येने बाळ गोपाळ, महिला व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपुर्ण मजेशीर सूत्रसंचलन प्रकाश महाजन सर यांनी केले तर कार्यक्रमातील सर्व उपस्थितांचे आभार स्वप्ना पाटिल यांनी मानले.
Related Stories
December 22, 2024