अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालय आणि फॉर्मसी कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय स्नेहसंमेलनाची यशस्वी सांगता झाली.
दि १२ ते १४ जानेवारी दरम्यान स्नेहसंमेलनाचे उदघाटन राजेश पांडे (सदस्य : राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी अनिल पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री,महाराष्ट्र राज्य) होते. यावेळी खा. शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, उपाध्यक्षा माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक हरी भिका वाणी, सीए नीरज अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य विनोद पाटील, चिटणीस तथा प्राचार्य डॉ ए बी जैन, सहचिटणीस डॉ धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ जी एच निकुंभ, डॉ कल्पना पाटील, डॉ जयंत पटवर्धन,डॉ.व्हि. बी. मांटे, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा पराग पाटील (उपप्राचार्य) व प्रा डी व्ही भलकार,उपप्राचार्य प्रा उल्हास मोरे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.सोनवणे, प्रा रवींद्र माळी उपस्थित होते. प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. आर.एम. पारधी, शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्नेहसंमेलनाच्या सुरूवातीला प्राचार्य डॉ ए बी जैन सर व स्नेहसंमेलन प्रमुख यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उदघाटन झाले.
याप्रसंगी मा.ना.श्री.अनिल पाटील म्हणाले की, महाविद्यालयायीन जीवनात अभ्यासासोबत विविध कलागुणही आत्मसात करणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांनी बहुआयामी व्हावे. असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयायीन आठवणींना उजाळाही दिला. तर राजेश पांडे म्हणाले की, प्रताप महाविद्यालय हे तुमच्यात पैलू पाडण्याचे काम करते. योग्य वेळी योग्य ज्ञानार्जन करा. या प्रताप महाविद्यालयाने आमच्यात विविध कार्याचे संस्कार रुजविले त्यामुळे आम्ही घडलो. असे मत व्यक्त केले.
स्नेहसंमेलनातील विविध कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. तर दोन्ही दिवस विद्यार्थ्यांनी दुपारच्या सत्रात काव्यवाचन, फॅन्सी ड्रेस, एकांकिका, नृत्य असे विविध मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुरुषोत्तम करंडक एकांकिका ‘तो पाऊस आणि टाफेटा’ सादर केली.
स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी समारोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला ऑनलाईन स्वरूपात प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध सरकारी वकील मा.पद्मश्री ॲड.उज्ज्वल निकम उपस्थित होते. त्यांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच ॲड.सुशील अत्रे,ॲड.सुशील जैन व प्रसिद्ध उद्योगपती मुकुंद विसपुते उपस्थित होते.ॲड.सुशील अत्रे यांनी या सत्रात आजचे वर्तमान आणि शिक्षण पद्धती यावर भाष्य केले. या समारंभाचे अध्यक्षस्थानी डॉ अनिल शिंदे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रमेश माने, प्रा.प्रतिमा लांडगे व प्रा.श्वेता पाटील यांनी केले तर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.एस. सोनवणे व प्रा डी व्ही भलकार यांनी आभार मानले.
स्नेह संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात येते. स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष, कार्योपाध्यक्ष,आणि सर्व कार्यकारी मंडळ,चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए.बी. जैन सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. पराग पाटील व प्रा. दिनेश भलकार,सर्व उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याचे प्रसिध्दी प्रमुख प्रा डॉ रमेश माने, प्रा.किरण पाटील यांनी कळविले आहे.