मा.जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांचा उपक्रम,शहरी व ग्रामीण भागातील महिलांची लक्षणीय उपस्थिती
अमळनेर:- तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा.जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस व ना.अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १६ रोजी अमळनेर शहरातील महिला तर १७ रोजी मतदारसंघातील ग्रामीण भागातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शहर व ग्रामीण भागातील जवळपास १० हजार पेक्षा जास्त महिलांची उपस्थिती होती.उपस्थित सर्वच महिलांना भेटवस्तू देण्यात आली.यावेळी जयश्री अनिल पाटील यांनी महिलांशी हितगुज साधले.
कार्यक्रमाला अमळनेर शहर व तालुक्यातील महिला मंडळ,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, बचत गटातील महिला,सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्या तसेच राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी श्रीमती राजश्री राजेश पाटील,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंदाकिनी भामरे, शहराध्यक्षा आशाताई चावरीया,अलका पवार,कविता पवार,भारती शिंदे,वैशाली ससाणे तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.