अमळनेर:- अयोध्येत होणाऱ्या प्रभु श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री गुरुदेव दत्त मंदिर व तिन्ही गावांचा परिसरात कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयातर्फे स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेतून मंदिर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात आला. या स्वच्छता अभियानाचे भाविकांमधून स्वागत होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री गुरुदेव दत्त मंदिर श्री चमत्कारी शनी मंदिर महादेव मंदिराचा परिसर यांचा मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छता मोहिमेत कै. सु आ पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक देसले व सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी गावातील सामाजिक कार्यकर्ता युवराज पाटील व लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य
यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.