
अमळनेर:- तालुक्यातील तांदळी येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा दिनांक २२ रोजी संपन्न होणार आहे.

संपूर्ण भारत देशात अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा सोहळा साजरा होणार असल्याने याच दिवशी तांदळी येथील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार, कोनशिला अनावरण कार्यक्रम होणार आहे. यात रविवार २१ रोजी दुपारी २ वाजता संपूर्ण गावात कलश यात्रा, सोमवार २२ रोजी सकाळी ७ ते ९ यावेळेत रामधून, सकाळी ९ वाजता जीर्णोद्धार, कोनशीला अनावरण, ९:३० वाजता सत्यनारायण महापूजा, ११ ते १ वाजता पंचामृत अभिषेक दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन येथील ग्रामस्थांनी केले आहे.

