अमळनेर:- येथील बाजार समितीत श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीत श्रीराम भक्त मित्र मंडळातर्फे प्रभू राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शेकडो भाविकांनी त्याचा लाभ घेतला यावेळी सभापती अशोक आधार पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, माजी जि.प. सदस्या जयश्री पाटील, यांच्यासह संचालक बाजार समितीचे कर्मचारी व व्यापारी उपस्थित होते. सदर महाप्रसादाचे आयोजन कापूस व्यापाऱ्यांनी केले होते.