अमळनेर :- तालुक्यातील मांडळ येथे दोघा भावांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी मुकेश रघुनाथ कोळी हे १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी घरी असताना भांडणाचा आवाज ऐकू आल्याने बाहेर गेले असता त्याचा मोठा भाऊ राकेश रघुनाथ कोळी व फिर्यादीच्या सासरच्या मंडळीत भांडण सुरू होते. ते सर्व राकेश यास मारहाण करू लागल्याने फिर्यादीने जावून अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यास ही मारहाण करण्यात आली. लोखंडी रॉडने व चापटा बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. धुळे येथे उपचार घेतल्यानंतर त्यांनी काल फिर्याद दिली असून त्यावरून रामचंद्र आनंदा शिरसाठ, राज रामचंद्र शिरसाठ, सुरेखा रामचंद्र शिरसाठ, जिजाबाई यशवंत शिरसाठ यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. भरत गायकवाड हे करीत आहेत.