सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:– येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सन 2021-2026 च्या पंचवार्षिक निवडणूकीचे मतदान आज रोजी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत सकाळी 8 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत होणार असून संध्याकाळी लागलीच निवडणूकीचा निकाल घोषित केला जाणार आहे.
13 जागेसाठी 28 उमेदवार रिंगणात असून बहुजन शेतकरी व परिवर्तन असे दोन पॅनल परस्परविरोधी असून एक अपक्ष उमेदवारही रिंगणात आहे. दोन्ही पॅनल व अपक्ष उमेदवार यांचा त्यांच्या परीने प्रचार जोरात झालेला असून बाहेर वास्तव्यास असलेल्या मतदारांना बोलविण्यावर दोन्ही पॅनलने भर घातली आहे. परिवर्तन पॅनल मध्ये सर्वसाधारण आठ जागेकरिता विठ्ठल बोरसे, सुनील चौधरी, हिरामण माळी, अरुण पवार, खासेराव पवार, नेहरू पवार, राहुल पवार, सुनील पवार, महिला राखीव प्रवर्गाच्या दोन जागेसाठी रिता बाविस्कर, प्रतिभा पाटील, इतर मागास प्रवर्गच्या एक जागेसाठी सुनील पवार, भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या एक जागेसाठी वना भोई, अनु.जाती जमाती प्रवर्गाच्या एक जागेसाठी जगन्नाथ सोनवणे उमेदवार म्हणून आहेत.तर दुसरीकडे बहुजन शेतकरी पॅनल मध्ये सर्वसाधारण आठ जागेसाठी जगतराव बोरसे, मधुकर चौधरी, योगेश चौधरी, सुभाष लाड, अनिल पाटील, कैलास पाटील, किशोर पाटील, संभाजी पाटील,महिला राखीव प्रवर्गच्या एक जागेसाठी रत्नाबाई पाटील, मंदाबाई शिंदे,इतर मागास प्रवर्गाच्या एक जागेसाठी भरत पाटील,भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या एक जागेसाठी राहुल लांबोळे, अनु.जाती जमातीच्या एक जागेसाठी चुडामन संदानशिव तर अपक्ष म्हणून भटक्या विमुक्त प्रवर्गात एकनाथ लोहार तर अनु.जाती-जमाती मधील अपक्ष उमेदवार जगन्नाथ संदानशिव यांनी बहुजन शेतकरी पॅनलला जाहीर पाठिंबा दिल्याचे समजते आहे. सर्व उमेदवारांनी आपल्याला पॅनलला मतदान मिळविण्यासाठी कंबर कसली असून सुज्ञ शेतकरी विकासोची सत्ता बहुजण शेतकरी पॅनल कडे देतात की परिवर्तन पॅनलला देतात याचा कौल संध्याकाळीच कळणार असून ग्रामस्थांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.