
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथील नानासाहेब उत्तमराव पाटील आश्रमशाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष श्री.डॉ. बी एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केलीत. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सामूहिक नृत्य केले. याप्रसंगी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम डॉ.बी एस पाटील, व्ही.डी.पाटील, नंदलाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक देखील हजर होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदीप सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन समाधान धनगर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोतीलाल चव्हाण, विनोद भदाणे, सिद्धार्थ पान पाटील, प्रशांत शिंदे, गोकुळ, पाटील, संजय पाटील, संदीप सोनवणे, सीमा साठे या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

