अमळनेर:- शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल येथे भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन डी.डी.पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच नीरज अग्रवाल यांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करून भारत मातेचा जयघोष झाला. विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर व शिक्षक वृंद कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यावेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन याविषयीचे महत्त्व व का साजरा केला जातो. याविषयीची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली. शाळेतील शिक्षिका यशस्वी चौधरी यांनी संविधानाविषयीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. त्यानंतर अध्यक्षीय भाषणाद्वारे “स्वच्छतेचा संदेश” देण्यात आला तसेच स्वच्छता व नियमांचे पालन प्रत्येक व्यक्तीने केले तर आपोआपच राष्ट्राची प्रगती घडून येईल हे नमूद केले. त्यानंतर शाळेचे उपमुख्याध्यापक यांनी त्यांच्या भाषणातून ‘संविधान प्रास्ताविकाचे’ महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका नंदिनी देशपांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.