अमळनेर:- राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र अध्यादेश काढल्याने अमळनेरात मराठा समाजातर्फे जल्लोष करण्यात आला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न उचलून धरत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली ते मुंबई असा पायी मोर्चा काढला होता.वाशी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला स्वतंत्र अध्यादेश मनोज जरांगे यांना सुपूर्द केल्याने अमळनेरात मराठा आंदोलकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
यावेळी प्रवीण देशमुख,जयवंत पाटील, हर्षल पाटील, सचिन वाघ, मनोहर निकम, कल्याण पाटील, ऍड.दिनेश पाटील, बाबू साळुंखे, प्रफुल्ल बोरसे, हर्षल देशमुख, रवींद्र पाटील,सलिम शेख, जयेश पाटील, विजय पाटील, विकास पवार, संजय सूर्यवंशी, प्रशांत निकम, शाम पाटील, किरण पाटील, अविनाश पाटील, राजू देशमुख, जितेंद्र देशमुख, अरुण देशमुख आदी उपस्थित होते.