
अमळनेर:- तालुक्यातील लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचलित सी.बी.एस. ई. सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल, मंगरूळ येथे गानसम्राज्ञी मा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा व शाळेच्या प्राचार्या डॉ. मंजुळा नायर व शिक्षकवृंद यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्या डॉ. मंजुळा नायर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे शिक्षक रामचंद्र मोहंती, नयना बोरसे व जूली खंगार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून लता मंगेशकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज बिऱ्हाडे यांनी केले तर आभार जूली खंगार यांनी मानले.




