
परिवर्तनचे 7 तर बहुजन शेतकरीचे 6 उमेदवार विजयी…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या सन 2021-2026 च्या सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल घोषित झाला असून परिवर्तन पॅनलचा सात उमेदवारांचा तर बहुजन शेतकरी पॅनलचा सहा उमेदवारांचा विजय झालेला असून निकाल संमिश्र लागल्याने दोन्ही पॅनलचे पूर्ण बहुमताचे स्वप्न धुळीस मिळाले.
एकूण तेरा जागेसाठी निवडणूक लागली होती. तेरा जागेसाठी अठ्ठावीस उमेदवार रिंगणात होते. परिवर्तन पॅनल, बहुजन शेतकरी पॅनल व अपक्ष उमेदवाराने जोरदार प्रचार करून मतांचा जोगवा मागितला होता. सोसायटीला प्रथमच ग्राम पंचायतीच्या निवडणूकीसारखे महत्व व वातावरण प्राप्त झाल्याने ही निवडणूक दोन्हीकडील पॅनलसाठी प्रतिष्ठेची होती. मतदानाच्या दिवशी सकाळपासून उमेदवार व समर्थकांची गर्दी दिसून आली.जणू काही ग्रामपंचायतीचे स्वरूप होते. दुपारपर्यंत स्थानिक मतदारांनी मतदान केल्याने दुपारून बाहेरगावाहून खाजगी चारचाकी वाहनाने मतदारांची रीघ लागून होती.एकूण 985 मतदार पैकी 826 मतदान झाले. तर बहुसंख्य मतपत्रिका बाद झाल्याने काही उमेदवारांना याचा फटका सहन करावा लागला. सोसायटीच्या इतिहासात प्रथमच एवढे मतदान झाल्याचे बोलले जात होते. सर्वसाधारण प्रवर्गातून जगतराव बोरसे (पराभूत-358), विठ्ठल बोरसे (पराभूत-355), मधुकर चौधरी (विजयी-407), सुनील चौधरी (पराभूत-354), योगेश चौधरी (पराभूत-360), सुभाष लाड (पराभूत-370), हिरामण माळी (पराभूत-340), अनिल पाटील (पराभूत-345), कैलास पाटील (विजयी-373), किशोर पाटील (विजयी-379), संभाजी पाटील (विजयी-386), अरुण पवार (विजयी-378), खासेराव पवार (पराभूत-351), नेहरू पवार (विजयी-376), राहुल पवार (विजयी-404), सुनील पवार (विजयी-404), महिला राखीव प्रवर्गातून रिता बाविस्कर (विजयी-431), प्रतिभा पाटील (विजयी-387), रत्नाबाई पाटील (पराभूत-382), मंदाबाई शिंदे (पराभूत-329) इतर मागासवर्गीय प्रवर्गातून भरत पाटील (विजयी-423), सुनील पवार (पराभूत-354), भटक्या विमुक्त जाती-जमाती मधून वना भोई (पराभूत-287), राहुल लांबोळे (विजयी-331),एकनाथ लोहार (पराभूत-145), अनु.जाती-जमाती मधून चुडामन संदानशिव (पराभूत-368), जगन्नाथ संदानशिव (पराभूत-13), जगन्नाथ सोनवणे (विजयी-389) अशा मतदानात मतदारांनी उमेदवारांना कौल दिला. परिवर्तन पॅनलमध्ये रिता बाविस्कर,राहुल पवार,सुनील पवार,जगन्नाथ सोनवणे,प्रतिभा पाटील,अरुण पवार,नेहरू पवार तर बहुजन शेतकरी पॅनलमध्ये भरत पाटील,मधुकर चौधरी, संभाजी पाटील,किशोर पाटील,कैलास पाटील,राहुल लांबोळे आदी उमेदवार विजयी झालेत. परिवर्तन पॅनलकडे चेअरमन पदासाठी लागणारे अल्प बहुमत असून बहुजन शेतकरी पॅनलला बहुमतासाठी एक उमेदवाराची गरज असून चेअरमन पदासाठी घोडेबाजार होण्याची शक्यता ग्रामस्थांमधून वर्तवली जात होती. मतदारांनी दोन्ही पॅनलला संमिश्र मते दिल्याने स्पष्ट असे बहुमत नसल्याने चेअरमन पदासाठी रस्सीखेच होऊन उमेदवारांची पळवापळवी होण्याची चिन्हे आहेत. निवडणूक प्रकिया किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून विवेक जगताप यांनी काम पाहिले. त्यांना निवडणूक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पातोंडा दुरुक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.