अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात शेकडो नागरिकांची उपस्थिती…
अमळनेर:- विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण अशा सांस्कृतिक विचार यात्रेने शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत झाली.
जिजाऊ सावित्रीच्या लेकी, छ.शिवाजी महाराज, म.फुले, गाडगेबाबा सारख्या अनेक महामानवाच्या वेशभूषाधारी नागरिक, आदिवासी संस्कृतीसह विविध सांस्कृतिक देखावे,विद्रोही तोफ यावेळी लक्षवेधी ठरली. संविधान व विविध धर्म ग्रंथ पालखीत ठेवून या दिंडीला मान्यवरांनी उचलून धरत या यात्रेचे उद्घाटन केले.यात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य अध्यक्ष प्रा.प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष श्याम पाटील, राज्य संघटक किशोर ढमाले, मुख्य संयोजक प्रा.डॉ.लिलाधर पाटील, संमेलनाचे मुख्य निमंत्रक रणजित शिंदे, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार, तसेच माजी जि प सदस्या जयश्री अनिल पाटील, गौतम मोरे,कार्याध्यक्ष मुकुंद सपकाळे, किशोर ढमाले, संयोजक करीम सालार, लीना राम पवार,अविनाश पाटील, धुळे, प्रशांत निकम,बापूराव ठाकरे अमळनेर यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते. उमेद अभियानाच्या तालुका अभियान व्यस्थापक सीमा रगडे, ज्योती भावसार यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिलांनी वेशभूषेसह विशेष सहभाग नोंदवला. अमळनेर मधील सरस्वती विद्यामंदिर, शांती निकेतन प्राथमिक विद्यामंदिर, जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय, साने गुरुजी विद्यामंदिर, उर्दू कन्या शाळा,समाज कार्य महाविद्यालय सोबतच अमळनेर चे सर्व रसिक प्रेषक यांनी उस्फुर्त आणि मोठ्या जल्लोषाने सहभाग नोंदवला.
रॅलीत चित्ररथावर संविधान प्रत होती तसेच सहभागी वेशभूषाधारी बापूराव ठाकरे, पुनम ठाकरे हे दाम्पत्य हे मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले.गाडगे महारांजाचे वेशभूषा केलेले एक वयोवृद्ध आकर्षक होते. घोड्यावर बाल शिवबा, मां साहेब जिजाऊ यांची वेशभूषा केलेल्या बालिका होत्या. मेघा पाटील व विद्यार्थी यांचे उत्कृष्ट लेझीम पथक, वैशाली पाटील व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे काठी पथक,अनिता संदानशिव रमाई ढोलपथक तसेच एक आर्मी जीप, संबंळ नृत्य, नंदीबैल नृत्य, जोगवा, भजन मंडळ, वारकरी पथक तसेच दहिवद गावाच्या वृक्ष लागवडीच्या मनरेगाच्या महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.