अमळनेर:- ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रविंद्र शोभणे यांनी अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात अचानक भेट दिली.मुख्य सभामंडपात प्रमुख चर्चासत्र सुरू असतांना मोठ्या लवाजमावासह डॉ. रविंद्र शोभणे यांनी भेट दिली.
यावेळी विद्रोहीच्या संयोजकांनी जेवणाचा आग्रह केला तर विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक रणजित शिंदे यांनी बळीराजा अन्न शिवारात डॉ.रविंद्र शोभणे यांचे तोंड गोड केले. डॉ.शोभणे यांनीही शिंदे यांना गोड खावू घातले.याप्रसंगी विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीचे स्थानिक अध्यक्ष गौतम मोरे, स्वागताध्यक्ष श्याम पाटील, मुख्य समन्वयक प्रा.अशोक पवार आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.