अमळनेर : घरमालक वरच्या मजल्यावर झोपलेले असताना अज्ञात चोरट्यानी खालच्या मजल्यावरील घर फोडून घरातील रोख रक्कम व सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना ११ रोजी रात्री पिंपळे रोडवरील जोशी पुरा भागात घडली.
गोकुळ पुंडलिक पाटील रा जोशींपुरा हे ११ रोजी रात्री त्यांच्या कुटुंबासह वरच्या मजल्यावर झोपायला गेले होते. सकाळी त्यांची पत्नी खाली आली असता घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. घरातील ८९ हजार रुपये रोख , ३८०० रुपयांचे सोन्याचे पान , १९ हजार रुपये किमतीचे ५ ग्राम सोन्याचे पेंडल , १९ हजार रुपये किमतीची ५ ग्राम सोन्याची अंगठी , असा एकूण १ लाख ३० हजार ८०० रुपयांचा ऐवज तर त्यांच्या शेजारील उर्मिला राजेंद्र मुंडे या देखील बाहेरगावी गेलेले असताना त्यांचे घराचे कुलूप तोडून ५ हजार रुपये रोख आणि ५ हजार रुपये किमतीचा एल ई डी टीव्ही चोरून नेला. अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलिस निरीक्षक विकास देवरे करीत आहेत.