
तरुणावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
अमळनेर:- अभ्यासानिमित्त फोनवर बोलणाऱ्या तरुणीचा बोलण्याचा गैरफायदा उचलत तरुणीच्या कुटुंब व होणाऱ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणावर अमळनेर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत तरुणी ही प्रताप महाविद्यालयात एमएच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असून तिच्यासोबत हर्षल हिम्मतराव पाटील (रा.दहिवद ता.अमळनेर) हा पण त्याच वर्गात शिक्षण घेत होता. दोघांचे अभ्यासासंदर्भात एकमेकांशी बोलणे होत होते.मात्र त्याचा वेगळा अर्थ काढून हर्षल पाटील हा पिडीत तरुणीकडे वाईट नजरेने बघू लागला. तरुणीचे डिसेंबर महिन्यात परीक्षा संपुन लग्न जमले.दरम्यान प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या लहान बहिणीस हर्षलने तुझी मोठी बहिण जर माझ्याशी बोलली नाही तर मी तुझ्या घरातील सर्वांना मारून टाकेन व तुझ्या बहिणीचे लग्न होवू देणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान तरुणीचा साखरपुडा झाल्याने हर्षल हा जास्तच चिडून गावात येवून माझ्या अंगणात फेऱ्या मारत होता. दि.११ फेब्रुवारी रोजी लग्नाच्या बस्त्यानिमित्त तरुणी व परिवार सुजान कलेक्शन मध्ये असल्यावर बाहेर उभी असलेल्या तिच्या लहान बहिणीला हर्षल याने गळ्यावर हात फिरवत मारून टाकेल अशी खून केली. तसेच बस्ता आटोपल्यावर घरी जात असतांना मागे मागे फिरत होता, म्हणून पिडीत तरुणीने अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.


