चेअरमनपदी शरद पाटील व व्हा. चेअरमनपदी संजय पाटील यांची बिनविरोध निवड…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी शरद वामनराव पाटील व व्हाइस चेअरमन पदी संजय पुना पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मावळते चेअरमन राकेश मुंदडा यांचा एका वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. दिनांक २१ रोजी सोसायटी आवारात ही निवड पार पडली. त्यानंतर सभासद व ग्रामस्थांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडी प्रसंगी माजी चेअरमन राकेश मुंदडे, संचालक अनिल पाटील, दिलीप पाटील, गुलाब पाटील, संजय पाटील, सुदाम शिंदे, बाबा सुर्वे, गावातील जेष्ठ नागरिक बाबुराव पाटील, जिजाबराव साळुंखे, उमाकांत साळुंखे, शरद साळुंखे, रोशन साळुंखे, भूषण साळुंखे, कासम खाटीक, कैलास पाटील, गोकुळ पाटील, सुनील साळुंखे, अशोक पाटील, बापू भामरे तसेच सोसायटीचे सचिव सुनील पाटील, कर्मचारी अनिल पाटील, रमेश पाटील हे उपस्थित होते.