अमळनेर:- येथील नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या अमळनेर शाखेकडून महिला दिनी शहरातील महिला डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
शहरातील रोटरी हॉल येथे ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त कुटुंब घर सांभाळून वैद्यकीय सेवा देवून अनेक रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या महिला डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अंजली चव्हाण यांनी सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अतुल चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. संजीव चव्हाण, डॉ. विशाल बडगुजर, डॉ. तुषार परदेशी, व मनीषा बडगुजर यांनी विशेष परिश्रम घेतले.