आदिवासी आश्रम शाळेत योग मार्गदर्शन शिबिर संपन्न…
अमळनेर:- शहरातील ताडेपुरा येथील एस. एस.पाटील प्राथमिक व कै. आण्णासो.हिराजी पाटील माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत योग प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना प्रा.डॉ.राहुल निकम यांनी निरोगी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे योग असे मत व्यक्त केले. या वेळी विचार पिठावर योगशास्त्र विषयाचे डॉ. नितीन मराठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील योगशास्त्र विभागाचे विद्यार्थी डॉ. नितीन मराठे आणि प्रा.डॉ.राहुल निकम यांच्यावतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुदानित आश्रम शाळेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आर. डी.पाटील होते. माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रजनीकांत भामरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.नितीन मराठे यांनी केले. योग शिबिराचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला. या शाळेत दि. 12/02/2024 पासून ते दि. 12/03/2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या कालावधीत रोज सकाळी सात ते आठ या वेळेत योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी बोलताना प्रा.डॉ.राहुल निकम यांनी योग ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले आणि सर्व विद्यार्थ्यांना नियमित योग करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले. यावेळी आश्रमशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. आश्रमशाळेत राबविण्यात आलेल्या अभियानाबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील योगशास्त्र विभागाचे प्रमुख इजि.डॉ.राजेश पाटील, प्रा.डॉ. लिना चौधरी, प्रा.डॉ. गीतांजली भंगाळे आणि इतर मान्यवरांनी समाधान प्रकट केले.