
अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथे सट्टा मटका घेणाऱ्या इसमावर मारवड पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निंभोरा येथे मारवड पोलिसांनी छापा टाकला असता बसस्थानकावर पान टपरीच्या मागे जिवनदीप सुरेश करणकाळे(वय ३८) हा कल्याण नावाचा सट्टा लावत लोकांकडून पैसे घेतांना पोलिसांच्या पथकाला आढळून आला. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळून आल्याने मारवड पोलिसांत मु.जु.ॲक्ट १२ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.

