अमळनेर:- अमळनेर तालुका मराठा समाज संस्थेच्या वतीने मराठा समाज वधू वर सूचक मंडळ स्थापन करण्यात आले.यात अध्यक्षपदी शिवाजीराव पाटील, उपाध्यक्षपदी पुंजु शिसोदे, प्रा.वंदना पाटील तर सचिवपदी कैलास पाटील यांची निवड करण्यात आली.
शहरातील मराठा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी अशी भानुदास आनंदा पाटील(सह सचिव),चुडामन पाटील (खजिनदार), योगेश पाटील (प्रसिद्धिप्रमुख), तर कार्यकारणी सदस्य पदी लहू पाटील,ज्ञानेश्वर पाटील, सुलोचना वाघ,भारतीबाई पाटील,रत्नाबाई भदाणे,करुणा वानखेडे, माधुरी पाटील,गुणवंत पवार, गुलाब पाटील,रमेश पाटील, डी.एम.पाटील,संजय सोनवणे, निळकंठ पाटील, वालजी पाटील तर कायम आमंत्रित सदस्यांमध्ये कैलास पाटील,स्वप्नील पाटील, जयवंतराव पाटील व विक्रांत पाटील यांचा समावेश आहे.
निवडीबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील,माजी आमदार डॉ.बी.एस. पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, स्मिता वाघ यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.