अमळनेर:- शहरातील रहिवासी डॉ.यश विलास बिऱ्हाडे एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.
डॉ. यशचे वडील विलास बिऱ्हाडे हे मारवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यश हा भाऊसाहेब हिरे शासकीय मेडिकल कॉलेज, धुळे महाविद्यालयातून एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला असून सत्कार करतेवेळी दिपक पाटील, योगेश कापडणे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. यश याच्या यशाबद्दल संपूर्ण बिऱ्हाडे कुटुंबीयांचे अभिनंदन करण्यात येत आहे.