
अमळनेर:- येथील लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित, सी.बी.एस.ई. सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल,मंगरूळ येथे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. याप्रसंगी नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात छोट्या चिमुकल्यांनी विविध वेषभूषा परिधान करून लोकांना आकर्षित केले. विद्यार्थ्यांनी नृत्य व नाटिका सादर करून सर्व अमळनेर वासियांचे मन जिंकले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा व शाळेच्या प्राचार्या डॉ. मंजुळा नायर व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी शैलजीत शिंदे व मनस्वी बोरसे यांनी केले तर आभार शिक्षक मनोज बिऱ्हाडे यांनी मानले.







