
अमळनेर:- येथील धुळे रस्त्यावर बेथेल चर्च जवळ पायी जाणाऱ्या इसमाचे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांना अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उल्हास बाजीराव सांवत रा.गणेश कॉलनी हे दि. २४ जानेवारी रोजी संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करुन अमळनेर शहरातुन रोडने पायी जात असतांना अमळनेर ते धुळे रोडवरील बेथल चर्च जवळ दोन अनोळखी इसमांनी दोन वेगवेगळ्या वेळी मोटर सायकल वर येवून त्यांच्या हातातील ८०००/- रुपये किमतीचा एक रेडमी कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट तसेच १०,००० / – रु.कि.चा विवो कंपनीचा मोबाईल असे बळजबरीने काढून घेतले होते . त्याबाबत अमळनेर पोलिसात भा.द.वि. कलम ३ ९ २,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान स्था.गु.शा.जळगांव यांचे कडुन तांत्रिक मदत घेत व इतर गोपनिय माहीत काढून पो. नि. जयपाल हिरे यांच्या सुचनेवरून तपासी अधिकारी पोउपनि . श्री . अनिल भुसारे, पोना. डॉ . शरद पाटील , पोना, सिध्दांत सिसोदे , पोको राजेंद्र देशमाने अशांनी धुळे , मालेगांव येथे जावून आरोपी नामे खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ वय २१ रा . दंडेवाल बाबा नगर ता.जि. धुळे यांस १५ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली व त्यास विश्वासात घेवून विचारपुस करता त्यांने सदर गुन्ह्यांची कबुली देवून त्यांने त्याचे साथीदार रितीक उर्फ दादु राजेंद्र राजपुत वय २० रा. पवन नगर, चाळीसगांव रोड, धुळे व शेख सेहजाद शेख साहीद हसन वय २१ रा. जाफर नगर, मालेगांव तसेच शेख शकील रईस अहमद वय २१ रा. जाफर नगर मालेगांव यांच्यासोबत अमळनेर शहरात वर नमुद दोन्ही मोबाईल हे जबरीने चोरुन नेले असल्याचे सांगितले. त्यानंतर इतर आरोपींना ही अटक करण्यात आली आहे. वरील आरोपीनी गुन्ह्यांची कबुली दिली असुन त्यांचे कडुन गुन्ह्यांतील वरील दोन्ही मोबाईल तसेच एक सँमसंग कंपनीचा मोबाईल असे एकूण ०३ मोबाईल काढुन दिले आहेत. सदर आरोपींवर अजूनही मोठ्या प्रमाणावर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.







