
करणखेडे येथील धनगर समाजाबांधवांनी निवेदनाद्वारे दिला इशारा…
अमळनेर:- मोदी आवास योजनेत इतर मागासवर्गीय ,विशेष मागासवर्गीय त्याच प्रमाणे विमुक्त जाती व भटक्या जमातींचा समावेश करण्याचा शासन निर्णय असताना देखील धनगर समाजाला घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. धनगर समाजाला घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास आमरण उपोषणास बसण्याचा इशारा करणखेडे येथील धनगर समाजाच्या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे ३० जानेवारी २०२४ शासन निर्णय काढून विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जातीच्या पात्र लाभार्थ्यांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तालुक्यातील करणखेडे येथील ग्रामपंचायतीत धनगर समाज सोडून सर्व समाजाला घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. सरपंच व ग्रामसेवक यांना वारंवार सांगून सुद्धा ग्रामसभेत ठराव करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे तालुक्यात देखील याची अंमलबजावणी झालेली नाही. तरी धनगर समाजाच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल न मिळाल्यास समाजातर्फे आमरण उपोषण केले जाईल असा इशारा विशाल धनगर, राजेंद्र धनगर, देविदास धनगर, किरण धनगर, अमोल धनगर, अनिल धनगर, भरत धनगर, योगेश धनगर, सुभाष धनगर, कैलास धनगर, विश्वास धनगर, भीमराव धनगर, मधुकर धनगर, धनराज धनगर, गजानन धनगर, रमेश धनगर, हिम्मत धनगर, संतोष धनगर, पितांबर धनगर अरुणाबाई धनगर, दिनकर धनगर, बारकू धनगर, छगन धनगर, मोहन धनगर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
प्रतिक्रिया…
सध्या आचार संहिता सुरू असल्याने कोणालाही लाभ देता येणार नाही. नियमांप्रमाणे योग्य ती कारवाई करून पात्र लाभार्थ्यांना घरकुले देण्यात येतील.
अर्पित चौहान (आयएएस), गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर