
अमळनेर:- जळगाव लोकसभा निवडणुकीअंतर्गत खर्च निवडणूक निरीक्षक चंदनकुमार (आयआरएस) यांनी २० रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या खर्च विषयक बाबींचा आढावा तसेच माहिती घेतली.
यावेळी त्यांनी कंट्रोल रुम, खर्च पथक,एक खिडकी योजना या विभागांना भेटी दिल्या. इफएसटी,व्हीएसटी,व्हीव्हीटी, तसेच निवडणूक खर्च बाबतीत पथक प्रमुखांची बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी महादेव खेडकर,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,मुख्याधिकारी तुषार नेरकर, निवडणूक नायब तहसीलदार प्रशांत धमके तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान दोन एफएसटी कर्मचारी नेमणूक केलेल्या विभागात आढळून आले नाहीत तसेच त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्या कर्मचाऱ्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महादेव खेडकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

