एकाला लोखंडी रॉडने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- काका पुतण्यामध्ये ग्राहकावरून वाद होऊन एकाला लोखंडी रॉड ने मारहाण केल्याची घटना २२ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास अमळनेर बसस्थानकासमोर घडली.
योगेश सुरेश शिंदे यांचे बसस्थानकासमोर रसवंतीचे दुकान असून २२ रोजी त्याच्या दुकानावर पैलाड येथील शांताराम अशोक पारधी व पवन राजेंद्र पारधी असे उसाचा कुच्चा घ्यायला आले असता दशरथ नथु शिंदे व नयनराज दशरथ शिंदे हातात लोखंडी सळई ,व दगड घेऊन आले. नयनराजने योगेशच्या डोक्यावर रॉड मारला. व दशरथ यांनी उजव्या पायाला दगड मारला.योगेश जखमी झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार घेऊन परत आल्यानंतर योगेशच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला काका व चुलत भाऊ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.