आगामी निवडणूकीत संधी देण्याची ग्रामस्थांची आग्रही मागणी…
सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- पातोंडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे निस्वार्थी भावनेने झटणारे भाजपाचे कार्यकर्ते घनश्याम उर्फ कैलास पाटील यांना आगामी येऊ घातलेल्या निवडणूकीत पक्षश्रेष्ठींनी संधी देण्याची मागणी पातोंडासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून होत असताना दिसत आहे.
पातोंडा गावाचा प्रशासकीय इमारतीचा, गावाचा भौगोलिक, शैक्षणिक, सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान देणारे घनश्याम पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना आपल्या वैचारिक, राजकीय विश्लेषण, नवनव्या संकल्पना, तर्कवितर्क बौध्दिकता, शांत, संयमी स्वभावामुळे नागरिकांमध्ये एक आगळे वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. भारतीय जनता पार्टीत काम करीत असताना त्यांनी तालुका व जिल्हास्तरावर विविध पदे भूषविली. पदांचा सरेमिरा न वाजविता केवळ नागरिकांच्या भल्यासाठी व केवळ गाव व आपली माणस पुढे जावीत हा उदात्त हेतू उराशी बाळगून निस्वार्थी भावनेने काम करत आहेत. भाजपाचे दिवंगत जिल्हाध्यक्ष उदय वाघ व माजी आमदार स्मिता वाघ यांच्या योग्य त्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत कोणत्याही निवडणूकीला सामोरे न जाता, कोणत्याही खुर्चीवर न राहता गावामध्ये कोट्यवधी कामांचा आखाडा उतरवण्यास त्यांना यश आलेलं आहे.पातोंडा येथील आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झालेली होती. गेल्या सात वर्षांपासून नवीन इमारतीचा निधी स्थानिक स्वयंघोषित पुढाऱ्यांनी लक्ष न घातल्याने निधी परतून जात होता. दरम्यान घनश्याम पाटील यांनी हा विषय हातात घेऊन माजीमंत्री गिरीश महाजन व माजी आमदार स्मिता वाघ यांच्या माध्यमातून व आपल्या चतुराईने हाताळला आणि आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत अंतिम टप्प्यात पूर्णत्वास येत आहे. त्याच प्राथमिक केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असून,ग्राम पंचायत पंचायत समिती,जिल्हा परिषद, नियोजन विभाग आदींचे ठराव पाठपुराव्याने करून नाशिक विभागाकडे प्रस्तावित केले आहेत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या भारत निर्माण योजनेला अपुऱ्या वीज पुरवठामुळे गावाला पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा होत होता ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या माध्यमातून शेतशिवाराला आठ तास व गावाला चोवीस तास वीज पुरवठा सुरळीत केल्यामुळे गावाला सुरळीत पाणी पुरवठा होत आहे. त्याचप्रमाणें पाणी पुरवठा मध्ये इलेक्ट्रॉनिक रिमोट ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोगही त्यांचा माध्यमातून झाला. दिवगंत उदय वाघ यांच्या प्रयत्नातून त्यांनी बस स्थानकाचे काम मार्गी लावले आहे. तसेच जलयुक्त शिवार अभियानात देखील गावाचा समावेश करून स्ट्रेच कम रिचार्ज शॉफ व बंधारे करून भूजल जलसाठ्यात वाढ झालेली दिसून आली आहे. तसेच गावातील शेतकऱ्यांना डिझेल साठी तालुक्यावर चकरा माराव्या लागत होत्या त्यासाठी पातोंडा येथील बाजार समितीच्या उपकेंद्रावर पेट्रोल पंपाचे काम मंजूर करून त्याचा योग्य तो पाठपुरावा करून आजरोजी पेट्रोलपंप देखील पूर्णत्वास येत आहे. तसेच माजी आमदार स्मिता वाघ,खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या माध्यमातून पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून पातोंडा ते जळोद रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. तसेच जि.प. सदस्या मीना पाटील यांच्या माध्यमातून पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी नूतन प्रशस्त अशी इमारत दिमाखात उभी करून दिली आहे. गावातील नाल्यापासून चोपडा धुळे रोडवर मोठ्या गटारीचे काम सुरू झालेले आहे. महिलांसाठी सार्वजनिक शौचालय व इतर मूलभूत व विकासाभिमुख कामे त्यांनी मार्गी लावण्यात त्यांनी सिंहांचा वाटा उचललेला आहे.गावातील वृक्ष लागवड, बिहार पॅटर्न, पाणी फौंडेशन, पातोंडा परिसर विकास मंच अशा अनेक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी गावात व परिसरात अनेक कामे केली असून पुढील काळात उद्योगपूर्ण गाव करण्याचा त्यांचा मानस असून त्यांची काम करण्याची पद्धत नितीन गडकरी सारखी अतिशय चातुर्य राजकीय खेळी अमित शहा सारखी योग्य निर्णय व कार्यपद्धती राबविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे अशा विकासाभिमुख व उदयोन्मुख निस्वार्थी युवा नेतृत्वाची गावाच्या व परिसराच्या विकासासाठी गरज असून पक्षश्रेष्ठींनी आगामी काळात येऊ घातलेल्या निवडणूकीत घनश्याम पाटील यांना संधी देण्याची आग्रही मागणी पातोंडा सह परिसरातील नागरिकांमधून होताना दिसत आहे.