अमळनेर:- स्तंभरोपण व समाधी मंदिरावर ध्वजारोहण करून संत सखाराम महाराज यात्रेचा शुभारंभ झाला. हभप प्रसाद महाराजांनी तालुक्यातील अधिकारी वर्ग,मानकरी व भक्तांना नारळ व खडीसाखर चा प्रसाद वाटप केला.
पहाटे प्रसाद महाराजांनी विठ्ठल रुख्मिनी व लालजींच्या मूर्तीची पूजा व आरती करून वाजत गाजत महाराज बोरी नदीच्या वाळवंटात समाधी मंदिराजवळ आले. पुजारी अभय देव, जय देव, सुनील देव,केशव पुराणिक, प्रज्वल देव यांच्या हस्ते पूजा करून अन्नपूर्णा स्तम्भ व मुख्य स्तंभरोपण आणि ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर प्रसाद महाराजांची पूजा करण्यात आली. यावेळी माजी न्यायाधीश गुलाबराव पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, जयश्री पाटील, ऍड ललिता पाटील, वसुंधरा लांडगे,डॉ अनिल शिंदे , प्रकाश पाटील (सुरत), प्रफुल पाटील, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विकास देवरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, न्यायाधीश, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता टी एच नेमाडे, अभियंता एन एच कुरसुंगे, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नितीन निळे, नरेंद्र ब्रम्हे, राजेंद्र देशमुख , दिलीप देशमुख, बाबा देशमुख, डॉ मिलिंद वैद्य ,राजेंद्र वैद्य , उदय देशपांडे , महेश कोठावदे , पवन शेटे , मनोज देवकर , केतन जोशी ,गंगाधर महाजन , शीतल देशमुख , मुन्ना शर्मा , दिलीप पाटील , दिनेश साळुंखे यांच्यासह भक्तांनी प्रसाद महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांनी प्रसाद वाटून विविध क्षेत्रातील व्यक्तींवर यात्रेची यथायोग्य जबादारी सोपवली.