विद्याविहार कॉलनीत एकाला डोक्यावर रॉड मारून केले जखमी..
अमळनेर:- आईच्या नावाने मजाक करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने एकाच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केल्याची घटना १२ रोजी रात्री विद्याविहार कॉलनीत घडली.
अंकित चंद्रकांत देशमुख हा १२ रोजी रात्री विद्याविहार कॉलनीच्या कमानीजवळ मित्रांबरोबर गप्पा मारत असताना तिकडून रवींद्र उर्फ विश्वनाथ पितांबर पाटील आला आणि त्याने अंकीतच्या आईच्या नावाने मजाक सुरू केली. आईच्या नावाने मजाक करु नको असे सांगितल्याचा रवींद्रला राग आला. त्याने चापटा बुक्क्यांनी अंकीतला मारहाण केली. हे पाहून विचारपूस करण्यासाठी अंकीतचे मित्र जमा झाले.त्यावेळी रवींद्र याने घरातून लोखंडी रॉड आणून अंकीतच्या डोक्यात वार केल्याने डोक्यातून रक्त येऊन तो गंभीर जखमी झाला. मित्रांनी त्याला तातडीने उपचारासाठी नर्मदा फाउंडेशनमध्ये दाखल केले त्याला १४ टाके पडले असून पोलिसांनी दवाखान्यात जबाब घेतल्यावरून रवींद्र पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत.