
अमळनेर:- श्री संत सखाराम महाराज यांचे शिष्य ह.भ.प. मोहन महाराज बेलापूरकर यांचे शनिवारी सकाळी शहराच्या वेशीवर आगमन झाले. आर.के.नगर प्रवेशद्वार जवळील गणपती मंदिरात पहिली पानसुपारी घेऊन दिंडी वाजतगाजत वाडी संस्थानाकडे रवाना झाली.

बेलापूरकर महाराज यांच्या गादीवरील पुरुष मोहन महाराज बेलापूरकर यांचे शुक्रवारी रात्री अमळनेर मध्ये रात्री आगमन झाले होते.रात्री मुक्काम करून ११ वे गादी पुरुष मोहन महाराज बेलापूरकर हे १८ रोजी सकाळी सात वाजता वाजतगाजत वाडी संस्थानाकडे रवाना झाले.यावेळी संत सखाराम महाराज वाडी संस्थानाचे गादी पुरुष प्रसाद महाराज यांनी वेशीवर जाऊन बेलापूरकर महाराज यांचे स्वागत केले. गुरुने शिष्याचे स्वागत करण्याची हजारो वर्षांची परंपरा अजून कायम आहे.या ठिकाणी दोन्ही महाराजांची पाद्य पूजा करण्यात आली.त्यानंतर प्रसाद महाराज व बेलापूरकर महाराज सजवून बैलांनी जुपलेल्या शिग्राम मध्ये बसले.सोबत वारकऱ्यांची दिंडी टाळ मृदुगांच्या गजरात दिंडी वाडी संस्थानाकडे रवाना झाली. रस्तात नागरिकांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून ठेवली होती.तर दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी विश्वस्त दिलीप देशमुख, रविंद्र माधवराव देशमुख,ह.भ.प. शारंगधर बुवा वारकरी पाठशाळेतील विद्यार्थी,व श्री अभय गुरुजी वेद पाठशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

