अमळगाव येथील तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल…
अमळनेर:- अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या अमळगाव येथील तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळगाव येथील तरुण मिलिंद शरद महाले याचे आणि अल्पवयीन मुलीचे प्रेम संबंध असल्याचे तिच्या पालकांना समजल्यावर दाम्पत्याने मुलीची समजूत काढली. त्यांनंतर मुलीने प्रियकराला फोन करणार नाही असे सांगितले. २० रोजी सायंकाळी ७ वाजता मिलिंद याने मुलीचा चुलत भावाला फोन लावून तू का समजावण्यास गेला म्हणून धमकी दिली. त्यांनंतर मुलीला फोन करून तुझे आणि माझे फोटो माझ्या मोबाईल मध्ये आहेत. ते व्हायरल करेल अशी धमकी दिली. मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून मिलिंद महाले विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.