अमळनेर,:- जंगलातून पाण्याच्या शोधात शहरातील सेंट मेरी शाळेत आलेल्या माकडला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजऱ्यात कैद करून त्याचा आदिवासात सोडले.
सध्या तापमानाने कहर केला असून जंगलातील अनेक पानवठे आटले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहेत. असेच एक नर जातीचे माकड अमळनेर शहरातील सेंट मेरी शाळेत बऱ्याच दिवसापासून आले होते. नर्सरी, प्ले गृप चे वर्ग सुरू होतील लहान मुलं घाबरण्याच्या भीती पोटी शाळेतील शिक्षकांनी वनविभागाला दिली. या माकडाची माहिती वनविभागाला मिळताच वनपाल पी. जे. सोनवणे, वनरक्षक जगदीश ठाकरे, वनपाल वैशाली गायकवाड, वनरक्षक अभिमन मोरे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली या माकडाला सेंट मेरी या शाळेच्या आवारातून पिंजऱ्यात कैद केले. त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.