निंभोरा शिवारातील घटना, एकाविरुद्ध गुन्हा दाखल…
अमळनेर:- येथून जवळच असलेल्या निंभोरा येथील वीट भट्टीवर माती भरणाऱ्या दोन्ही मजुरात हसण्यावरून राग अनावर होऊन फावड्याने डोके फोडले. याबाबत तक्रार दाखल होऊन एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर येथील समाधान लाला भिल भिल,प्रवीण अंकुश पारधी व देवगाव देवळी येथील समाधान लकडू भिल असे तीनही जण एका वीट भट्टीवर कामाला असून माती भरण्यासाठी निभोरा येथील ट्रॅक्टर भरून झाल्यावर जेवण करून हसत खेळत मजाक करीत असताना समाधान लकडू भिल यास राग अनावर होऊन त्याच्या हातातील लाकडी फावड्याने समाधान लाला भिल यास डोक्यावर हातावर मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून फिर्याद दिल्यावरून मारवड पोलिसांत देवगाव देवळी येथील समाधान लकडू भिल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार संजय पाटील हे करीत आहेत