अमळनेर:- तालुक्यातील चौबारी येथील ६५ वर्षीय इसम अमळनेर येथे जावून येतो असे सांगून आजपावेतो परत न आल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार मारवड पोलीसात देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चौबारी येथील आनंदा अवचित पाटील (वय ६५) हे दिनांक २४ मे रोजी सकाळी अकरा वाजता अमळनेर येथे दवाखान्यात जावून येतो असे सांगून निघाले. मात्र सायंकाळ झाली तरी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र आजपावेतो कोणताच तपास न लागल्याने त्यांच्या मुलाने मारवड पोलिसांत हरविल्याची फिर्याद दिली असून पुढील तपास हे कॉ शरीफ पठाण हे करीत आहेत.