अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ या संस्थेचे सु. हि.मुंदडे हायस्कूल व श्रीमती. द्रौ.फ.साळुंखे कनिष्ठ महाविद्यालय, मारवड येथे इ.8 वी ते इ.१० वीच्या ७१ विद्यार्थिनींना मानव विकास कार्यक्रम अंतर्गत सायकल वाटप करण्यात आल्या.
संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व सर्व संचालक यांच्या हस्ते ह्या सायकल वाटप करण्यात आल्या. सदरहू योजना मोफत असून ग्रामीण भागातील विद्यार्थिनी शिक्षणाच्या प्रवाहात राहाव्यात तसेच शिक्षणापासून वंचित राहू नयेत अशी आहे. सदर योजनेच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर यांनी सहकार्य केले.