प.पू.महामंडलेश्वर श्री. अखिलेशश्वरदासजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न…
अमळनेर:- केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प पू महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते झाडी येथील मूळ रहिवासी व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित गुजराथ एटीएस मधील निवृत्त पोलीस अधिकारी प्रकाशभाई आर पाटील यांच्या येथील जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा सकाळी ११ वाजता जल्लोषात संपन्न झाला.
सकाळी ७ वाजता केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प पू महामंडलेश्वर श्री अखिलेश्वरदासजी महाराज यांच्या शुभ हस्ते तालुक्यातील झाडी येथील मंदिरावर होमहवन संपन्न झाले. त्यानंतर महाराजांच्या हस्ते प्रकाशभाई पाटील युवा मंचच्या झाडी शाखेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी झाडी परिसरातील महिला व पुरुष गावकरी मोठ्या संख्येने हजर होते. होमहवन झाल्यानंतर यावेळी प. पू. महामंडलेश्वर श्री. अखिलेश्वरदासजी महाराज यांचे महिला व पुरुष वर्गाने आशीर्वाद घेतले. त्यानंतर महाराजांसोबत झाडी येथील तरुणांची मोटारसायकल रॅली थेट अमळनेर शहरात पोहचली. हॉटेल मिडटाऊन येथून सकाळी १० वाजेपासून घोड्यांच्या बग्गीवर केंद्रीय मार्गदर्शक मंडल धर्माचार्य प. पू. महामंडलेश्वर श्री. अखिलेश्वरदासजी महाराज यांचा मिरवणूक निघाली. यावेळी मिरवणुकीत महिला व पुरुष वर्ग यांचा समावेश होता. मिरवणूकीचे हॉटेल ते सुभाष चौक, ते स्टेशन रोडवरून, तहसील कार्यालय व महाराणा प्रताप चौकातून धुळे रस्त्यावरील शिवांश बिझिनेस हब येथे कार्यालय स्थळी आगमन झाले. यावेळी ठिकठिकाणी महाराजांचे व प्रकाशभाई पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर जनसंपर्क कार्यालयाचा महाराजांच्या हस्ते पूजा करून शुभारंभ झाला. त्यानंतर महाराजांच्या हस्ते रुग्णवाहिका शुभारंभ झाला. यावेळी जेष्ठ उद्योगपती सरजू गोकलानी, माजी नगरसेवक लालू सैनानी, झाडी येथील जेष्ठ नेते धनगर दला पाटील,काँग्रेसचे नेते डॉ. अनिल शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) माजी नगरसेवक श्याम पाटील, राष्ट्रवादी (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, शिवसेना ( उबाठा) चे पारोळा येथील नेते हर्षल माने, कॉन्ट्रॅक्टर शिरीष पाटील, डॉ.प्रशांत शिंदे, हरि भिका वाणी, पारोळा येथील भाजपचे ॲड. अतुल मोरे, उद्योजक वसंतबापू पाटील, चोपडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) चोपडा येथील नेत्या ज्योती पावरा (बारेला), सुरत येथील उद्योजक मित्र, सुरत येथील मित्रपरिवार, अमळनेर येथील प्रकाशभाई युवामंचचे प्रवीण देशमुख व युवा मंचाचे सदस्य, सुंदरपट्टी येथील माजी सरपंच सुरेश पाटील, गोवर्धन येथील शाम पाटील, झाडी सरपंच डॉ. भुपेंद्र पाटील, अमळगावचे उदय नंदकिशोर पाटील, माजी नगरसेवक बाळा पवार, झाडी येथील गुणवंत पाटील, संतोष पाटील, ढेकूचे नथू आण्णा पाटील यांच्यासह विविध गावातील नागरिक मोठया संख्येने हजर होते. त्यानंतर प्रकाशभाई पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळावे यासाठी त्यांनी छोटे उद्योग उभे करण्याचा मानस यावेळी व्यक्त केला. व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर महाराजांनी आशीर्ववचन उपस्थितांना दिले. यावेळी अनेकांनी प्रकाशभाई पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रम संपन्न झाल्यावर महाराजांचे हॉटेल मिडटाऊनकडे प्रस्थान झाले. यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.