अमळनेर :- तालुक्याचा इयत्ता १० विचा निकाल ९७.३३ टक्के निकाल लागला असून तालुक्यातील ७९ पैकी तब्बल ३२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
तालुक्यातील ३,७२० विद्यार्थ्यांपैकी ३,६८३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते.यापैकी ३५८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यात १८०८ विदयार्थी विशेष प्राविण्य, १२८५ प्रथम श्रेणी,४१९ द्वितीय श्रेणी तर ७३ विद्यार्थी पास श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातून एन.टी.मुंदडा ग्लोबल शाळेची विद्यार्थिनी वैभवी गोसावी ९७.८० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.
जी. एस. हायस्कूल…
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जि.एस.हायस्कूल चा ९८.८७ टक्के निकाल लागला असून ३५६ पैकी ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १५६ विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह तर ७२ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.शाळेतून ९० % च्या वर एकूण २७ विद्यार्थी आले आहेत.
प्रथम- भामरे प्रथमेश अजय (९५.८०%),
द्वितीय-पाटील आदित्य किरण (९५.२० %)
तृतीय- महाजन ऋषिकेश गोपाल (९४.४०%),ठाकूर प्रसाद अजित (९४.४०%)
चतुर्थ-पुरकर अर्चित शामकांत (९४.२० %) गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी,मुख्याध्यापक बी.एस.पाटील,उपमुख्याध्यापक सी.एस.पाटील,पर्यवेक्षक ए.डी. भदाणे,एस.आर.शिंगाने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय…
मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १० वी चा निकाल ९५.१२ टक्के लागला असून प्रथम-मोहिनी आनन्दा पाटील (८८.२०%)
द्वितीय-सोनल विलास पाटील (८७.४०%)
तृतीय-निलेश विकास पाटील(८४.६०%)
चतुर्थ-नंदिनी भटू पाटील (८४.२०%) गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत शाळेचे अध्यक्ष , सचिव , संचालक मंडळ , मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
द्रौ. रा. कन्या शाळा…
येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित द्रौ.रा.कन्या शाळेचा निकाल ९८.४३ % लागला आहे.
शाळेतून प्रथम-पाटील तनुजा संदेश (९६.४० %),
द्वितीय- पटेल तन्वी योगेश (९६.२०%),
तृतीय -पाटील आकांक्षा राजेश (९५.८०%),
चतुर्थ-वाणी वैष्णवी राजेंद्र(९५.४०%) गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. शाळेचे चेअरमन सी.ए.नीरज अग्रवाल, मुख्याध्यापिका एस.एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक एस.बी.निकम,पर्यवेक्षक व्ही.एम.कदम,एस.पी.बाविस्कर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनदंन केले आहे.
एन.टी.मुंदडा ग्लोबल स्कूल…
येथील एन.टी.मुंदडा ग्लोबल शाळेचा ९९.३५ % निकाल लागला असून, शाळेतून प्रथम-वैभवी गोसावी (९७.८०%)
द्वितीय-युतीका संजीव पाटील (९७.००%)
तृतीय-अनोखी गुरव (९६.४०%) गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सचिव, सदस्य, प्राचार्य तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
सु. हि. मुंदडे हायस्कूल, मारवड…
सु. हि . मुंदडे हायस्कूल व श्रीम.द्रौप फ.साळुंखे क.महाविद्यालय, मारवड येथील इ. 10 वी निकाल 100% लागला असून
प्रथम – रितिका महेंद्र लोहार 94.40%
द्वितीय – प्रसन्न राजेंद्र चौधरी 92.20%
तृतीय – मनस्वी लक्ष्मीकांत वाणी 92.20%
यांनी पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना ग्राम विकास शिक्षण मंडळ अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय…
येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १० वीचा निकाल 100% लागला असून यावेळी 71 विद्यार्थी परिक्षेस बसले होते, यात ७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले तर २६ विद्यार्थीनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
1) प्रथम : चैताली विजय पाटील -92.20%
2) द्वितीय: क्रमांक नेहा बापू पाटील -92%
3) तृतीय :क्रमांक मानसी दीपक चौगुले -91.80%
4) चतुर्थ: नंदिनी प्रवीण सोनवणे-91.60
5) पाचवी-हर्षदा रवींद्र बोरसे 91.00
या यशवंत ,गुणवंत विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, संस्थेचे उपाध्यक्ष, व संस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ व सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
कै. सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालय, पिंपळे बु.
पिंपळे येथिल कै सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालय पिंपळे बुद्रुक इयत्ता 10 वी चा निकाल 100% लागला आहे
शाळेतून,
प्रथम – डिंपल रवींद्र सैदाने – 88.60 %
द्वितिय – जागृती सुनील पाटील -86.00 %
तृतीय – तेजस प्रमोद पाटील – 85. 00%
विद्यार्थ्यांचे ग्रामविकास मंडळ नवलनगर संचलित संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी पिंपळे खुर्दचे लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील, उपसरपंच, सर्व सदस्य व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Related Stories
December 22, 2024